Private Advt

हरिविठ्ठल नगरातील तरुण बेपत्ता

जळगाव –  शहरातील हरिविठ्ठल नगरातील धनराज देवीदास खलसे वय 22 हा तरुण गेंदालाल मील येथून बेपत्ता झाला आहे. याबाबत रविवार, 16 जानेवारी रोजी शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. देवीदास रतन खलसे हे हरिविठ्ठल नगरात पत्नी तसेच मुलगा धनराज यांच्यासोबत वास्तव्यास आहेत. खलसे यांची पत्नी पद्माबाई या गेंदालाल मील येथे काम करण्यासाठी जातात. शुक्रवार, 14 जानेवारी रोजी धनराज यास त्याचे वडील देवीदास खलसे यांनी पद्माबाई काम करत असलेल्या ठिकाणी गेंदालाल मीलमध्ये सोडले. सायंकाळी धनराज याची आई पद्माबाई या कामावरुन परतल्या. मात्र धनराज परतला नाही. धनराज हा पद्मबाई यांच्याकडे पोहचलाच नसल्याचे समोर आले. सर्वत्र शोध घेवूनही धनराज मिळून न आल्याने त्याच्या वडीलांनी रविवारी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन बेपत्ता झाल्याबाबत नोंद करण्यात आली आहे.