Private Advt

विदगावच्या विवाहितेचा छळ

मुलीच होतात या कारणावरुन जळगाव तालुक्यातील विदगाव येथील विवाहितेचा मारहाण करत छळ करणार्‍या पतीसह सासरच्या 4 जणांविरोधात शनिवार, 15 जानेवारी रोजी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

विवाहिता मनिषा सुरेश तायडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार असे की, लग्नानंतर मनिषा यांना दोन मुली झाल्या. मुलीच झाल्याच्या कारणावरुन पती सुरेश गौतम तायडे यांनी वेळोवेळी मनिषा हिस शिवीगाळ तसेच मारहाण केली. तर सासू, सासरे तसेच नणंद यांनी सुध्दा मुली होत असल्याच्या कारणावरुन मनिषा हिस अर्वाच्च भाषेत बोलून मानसिक छळ केला. छळाला कंटाळून मनिषा ह्या माहेरी निघून आल्या.

 

याबाबत त्यांनी शनिवारी तालुका पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन पती सुरेश गौतम तायडे, सासरे गौतम मिठाराम तायडे, सासू संगीता गौतम तायड, व नणंद योगीता भालेराव सर्व रा. यावल. ता. यावल जि. जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे हे करीत आहेत.