Private Advt

आकाशवाणी चौकाला जिजाऊ यांचे नाव द्यावे

जळगाव – राजमाता जिजाऊ यांच्या नावाने जळगाव शहराचे वैभव वाढेल , या नावाने ही भूमी पावनच होणार आहे . इतिहासामधील सोनेरी पान म्हणजे जिजाऊ मातेचं कार्य आहे . मनपाने सदर नाव देण्याची कार्यवाही त्वरित करावी अशी मागणी आज सर्व पक्षांच्या प्रमुखांनी केली . सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने संयोजन प्रमुख शंभु पाटील यांनी सर्व पक्ष प्रमुखांना आमंत्रीत केले होते . राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील , शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे , भाजपा नगरसेवक कैलास सोनवणे , काँग्रेस महानगर अध्यक्ष श्याम तायडे , मनसे प्रमुख जमिल देशपांडे ,एजाज मलिक , शरद तायडे , राष्ट्रवादी पुरुषोत्तम चौधरी , विनोद देशमुख ,  मुकुंद सपकाळे ,  सुरेंद्र पाटील , खुशाल चव्हाण , विकास मराठे व शिवप्रेमी उपस्थित होते .