Private Advt

मनपाकडून शहरातील डॉक्टर्स,हॉस्पिटलधारकांना सापत्नभावाची वागणूक

डॉ राधेश्याम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले सवाल

जळगाव मनपाकडून शहरातील डॉक्टर्स,हॉस्पिटलधारकांना सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. मनपाद्वारे डॉक्टरांवरिल,हॉस्पिटलसंबंधीत विविध करांची आकारणी नियमबाह्य,अन्यायकारकरित्या केली जात आहे. त्याद्वारे मनपा प्रशासन डॉक्टरांचे आर्थिक शोषण करित आहे. मनपाद्वारे डॉक्टरांच्या या अडवणूक,पिडवणूकीबद्दल डॉक्टर वर्गात प्रचंड असंतोष दिसून येत आहे. असे डॉ राधेशाम चौधरी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले

 

 

यावेळी ते म्हणाले कि , अग्निशमन सेवेसाठी ४ वेगवेगळ्या  नावांनी कर, निधी जळगाव मनपाद्वारे दवाखान्यांना आकारला जातो. एकाच प्रकारच्या सेवेसाठी ४ नावांनी निधी ,कर आकारणे नियम व कायद्याला धरून वाटत नाही.  याबाबबतीत गेली ७-८ वर्षे आयएमए जळगाव मनपा प्रशासन व पदाधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करत आहे. परंतु मनपा प्रशासन ठोस पावले न उचलता आश्वासन देवून वेळ मारून नेत असते.

याच बरोबर आता मनपा प्रशासनाच्या वतीने शहरातील मालमत्तांचे फेरमुल्यांकनाच्या नावाने डॉक्टरांना पुन्हा अन्यायकारक अत्यंत अवाजवी रित्या  प्रस्तावित केलेली बिले मिळाली आहेत. वापराचे प्रयोजन बदलले नसतांना,कोणतेही नविन वाढीव  बांधकाम नसतांना २-३ पट वाढीव कर आकारणी कोणत्या सुत्राने प्रस्तावित केली हे न समजणारे कोडे आहे. बेसमेंट वापरात नसुनही अरहिवास या हेडींगमधे वाढीव कर आकारला आहे.  बेसमेंट स्टोअरेज म्हणून वापर असल्यासही अरहिवास या हेडींगखाली कर आकारणी केलेली आहे.  बहूतांश डॉक्टरांचे निवासस्थान व दवाखाना एकाच ठिकाणी असल्याने मनमानी पद्धतीने रहिवास व अरहिवास असे क्षेत्रफळ अन्यायकारकरित्या अवाजवी पद्धतीने दाखवून अव्वाच्या सव्वा कर आकारणी प्रस्तावित केलेली आहे.  पार्किंग एरिया साठीही कर आकारणी प्रस्तावित केलेली आहे.
हॉस्पिटल्स जैविक घनकचरा कर ३. ०५ रू प्रति बेड प्रति दिन असा कर मनपाशी आर्थिक सामंजस्य करारात कार्यरत मॉंन्साई बायोमेडील वेस्ट एंटरप्राईजला नियमितपणे अदा करत असतात. तरीही त्यांना पुन्हा घनकचरा व्यवस्थापन कर करयोग्य मुल्याच्या २% ऐवजी दुप्पट ४% एवढा प्रस्तावित केलेला आहे.
हॅास्पिटल्सच्या जुन्या इमारती वापरात नसतांनाही अरहिवासी दराने वाढीव कर प्रस्तावीत केलेले आहेत.
एकही डॉक्टर मनपा मालमत्ताकराचा थकबाकीदार नसावा. सर्वच जण नियमित कर भरतात. किंबहूना बहूतांश डॉक्टर्स एप्रिल मधेच वर्षाच्या सुरूवातीसच अँडव्हांसमधे कर भरतात.
गेली दोन वर्षे कोविड१९ च्या खडतर काळातही जळगाव आयएमए च्या सदस्य डॉक्टरांनी जनतेचे आरोग्यरक्षण जीव धोक्यात टाकून केले. आताही जनतेसमोर कोविडच्या तिसर्या लाटेचे संकट उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत गेली दोन वर्षे बहूतेक खाजगी दवाखान्यांनाही आर्थिक झळ पोहोचलेली आहेच.
असे असुनही मनपा प्रशासन शहरातील डॉक्टर वर्गाची अडवणूक व आर्थिक पिडवणूक करू पाहते आहे. जनता , मनपा पदाधिकारी व प्रशासन यांनी डॉक्टरांना न्याय मिळेल अशी भूमिका घ्यावी हि अपेक्षा आयएमए  व्यक्त करतेय.
आयएमए जळगावच्या प्रमुख मागण्या
अग्निशमन बाबतीत मनपा अधिनियमांना धरून एकसुत्री कर आकारणी करावी.
इतर बेकायदेशीर हेडींग खालील कर आकारणी तातडीने रद्द करावी. 
नविन फेरमुल्यांकनातील अरहिवास घनकचरा कर रद्द करावा.
हरकतदार डॉक्टर्सच्या इमारतींना मागणीनुसार भेट देवून मोजमाप करून योग्य ते बदल करून नव्याने आकारणी करावी.