Private Advt

दिलासादायक : जिल्ह्यात ९६% बाधितांना साैम्य लक्षणे

काेरोनाच्या तिसऱ्या लाटेत जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांचा आकडा अकरा दिवसांत २० वरून ७६७ पर्यंत गेला आहे  मात्र, असे असले तरी यापैकी ९६ टक्के रुग्णांना साैम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत. केवळ २७ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातही पाच रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची आवश्यकता भासली. दुसरीकडे, तपासले गेलेल्या सॅम्पलपैकी बाधित होण्याचा वेग नऊ टक्क्यांवर आहे. मात्र बहुतांश रुग्णांना लक्षणे नाहीत. किरकोळ सर्दी, ताप, खोकला असल्याने ते घरीच उपचार घेताहेत.
जिल्ह्यात मंगळवारी नवीन २२१ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समाेर अाले. त्यात शहरातील ४३ रुग्णांचा समावेश आहे. शहरात आरटीपीसीआर चाचणीद्वारे १८ तर रॅपिड अँटिजेन चाचणीद्वारे २५ जण बाधित अाहेत. कोरोनाची तिसरी लाट तीव्र नसली तरी संसर्गाचा वेग अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नसली तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे. दिवसभरात शहरात चार रुग्ण बरे झाले असून, सक्रिय रुग्णांची संख्या २०३ झाली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य यंत्रणा सज्ज झाली अाहे. मोहाडी, महापालिका रुग्णालयासह जीएमसीत आयसीयू व सी-टू वॉर्ड तयार आहे. सध्या मोहाडी रुग्णालय व जीएमसीत रुग्ण उपचार घेताहेत. जीएमसीत पाच रुग्ण आयसीयूत उपचार घेताहेत.