सासरकडून विवाहितेचा छळ; आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल

साक्री । सासरच्या लोकांकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याची फिर्याद सीमा सागर शिवणेकर यांनी साक्री येथील पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. दाखल फिर्यादनुसार सीमा शिवणेकर यांचे पती सागर संतोष शिवणेकर, सासरे संतोष लालचंद शिवणेकर, सासू मंगला शिवणेकर, दिर योगेश उर्फ कोमल शिवणेकर(सर्व रा.कृषीनगर, भडगाव रोड, पाचोरा, जि.जळगाव) आणि मामसासरे विजय शिवलाल ब्राह्मणे, मामसासु दीप्ती विजय ब्राह्मणे(एस.आर.पी.कॅम्प, धुळे), सासूचे वडील शिवलाल पुना ब्राह्मणे, सासूची आई राधाबाई शिवलाल ब्राह्मणे (रा.पुनगाव, ता.पाचोरा, जि.जळगाव) यांनी माहेरून 7 लाख 70 हजार आणले नाहीत, म्हणून सीमा शिवणेकर यांच्यावर अत्याचार केले. बळजबरीने गर्भपात करून घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत साक्री पोलीस स्टेशन येथे कलम 498 अ, 406 313, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल
केला आहे.