अवैध वाळू वाहतूक करणारे सात ट्रॅक्टर मुक्ताईनगरात जप्त

मुक्ताईनगर : तालुक्यात अवैध वाहतुकीला ऊत आला असतानाच पोलिसांनी अचानक धाडसत्र राबवत सात ट्रॅक्टर जप्त केले तर 11 जणांविरोधात गुन्हा (Guna) दाखल केल्यानंतर अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍यांच्या गोटात धडकी भरली आहे. रविवार, 9 जानेवारी रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. वाळूने भरलेल्या सात ट्रॅक्टरसह 21 लाख 91 हजाराां मुद्देमाल पोलिसांनी हप्त केला.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
अवैध वाळू वाहतूक प्रकरणी हवालदार रवींद्र मेढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल बाळू महाजन (रा.चांगदेव), प्रदीप बाळू शिरतुरे (रा.पिंप्रीनांदू), प्रकाश शांताराम बारेला (रा.पिंप्रीनांदू), रहिम शहा करीम शहा फकीर (रा.पिंप्रीनांदू), अरुण दत्तू महाजन (रा.पिंप्रीनांदू)ू, अतुल कैलास अटकाळे (धूरखेडा, ता.रावेर), किशोर बाळू भोई (रा.पिंप्रीनांदू), नितीन माणिक कोळी (पिंप्रीनांदू), चंद्रकांत रघुनाथ पाटील (रा.धूरखेडा, ता.रावेर), नदीम शहा करीम शहा फकीर (रा.पिंप्रीनांदू), एम.एच.28 टी.6494 ट्रॅक्टरवरील चालक, मालक नाव गाव माहीत नाही यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला शिवाय दुचाकी एम.एच.19 बी.आर.7343 व दुचाकी एम.एच.19 डी.टी.4138 जप्त करण्यात आली आहे. संशयीतांना मुक्ताईनगर (Muktainagar) शहरातील स्मशान भूमीजवळ, खामखेडा पुलाजवळ, नायगाव जवळील घंटा मारोती जवळ, पिंप्रीनांदू शिवारातील तापी नदी (Tapi River) काठाजवळ, बेलसवाडी फाटा ते पिंप्रीनांदू रोडलगत सार्वजनिक जागी अवैध वाहतूक करताना पोलिसांनी पकडले. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना अटक करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ (PI Rahul Khatal) यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहे.

यांचा होता पथकात समावेश
पोलिस निरीक्षक राहुल खताळ PI Rahul Khatal, उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे, पोलिस नाईक संतोष नागरे, हवालदार गणेश मनुरे, पोलिस नाईक मोतीलाल बोरसे, हवालदार नितीन चौधरी, राहुल बेहेनवाल, रवींद्र मेढे, रवींद्र तायडे, अनिल देवरे, अशोक जाधव, सुनील नागरे, उमेश महाजन, विशाल पवार, चंद्रशेखर नाईक, संजय पवार, सुरेश पाटील, नंदकिशोर धनके यांच्यासह 10 होमगार्ड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

यापुढेदेखील धडक कारवाया सुरूच राहणार : राहुल खताळ
मुक्ताईनगर तालुक्यात (Muktaingar Taluka) अवैध वाळूची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने त्या पार्श्वभूमीवर रविवारी पहाटे ट्रॅप लावून कारवाई करण्यात आली. कारवाई सुरू असताना साधारणपणे पाच ट्रॅक्टर पळून गेले असलेतरी त्यांची नावे निष्पन्न केली जातील. आजच्या कारवाई ट्रॅक्टर चालकच नव्हे तर चालक, मालक तसेच निरीक्षण करणार्‍या दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. कारवाई काही विना पासिंगची वाहने असल्याने आरटीओ विभागाकडून अधिक कारवाईसाठी अहवाल पाठवण्यात येईल शिवाय भविष्यातही अशाच पद्धत्तीने कारवाई सुरू राहील, असे पोलिस निरीक्षक राहुल खताळ PI Rahul Khatal म्हणाले.