Private Advt

नभोर्‍यातील वृद्धाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

विजेचा धक्का लागल्याने वृद्धाचा मृत्यू ः निंभोरा गावातील घटना

पाचोरा ः विजेचा धक्का लागून पाचोरा तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 8 रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कैलास नथ्थू पाखले (वाणी, 68, रा.निंभोरा बुद्रुक, ता.पाचोरा) असे मयताचे नाव आहे.

वायरचा स्पर्श झाल्याने लागला शॉक
कैलास पालखे हे शनिवार, 8 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घरात इलेक्ट्रीकचे किरकोळ काम करीत असतांना त्यांच्या हाताला वायरचा स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तत्पूर्वी तातडीने त्यांना नातेवाईकांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंके यांनी मयत घोषीत केले.

पाचोरा पोलिसात ठाण्यात नोंद
या घटनेबाबत पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ही नोंद पिंपळगाव (हरेश्‍वर) पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली. तपास सहा.पोलिस निरीक्षक कृष्णा भोये यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राकेश खोंडे करीत आहेत. मयत वृद्धावर रविवार, 9 रोजी दुपारी 12 वाजता निंभोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत वृद्धाच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परीवार आहे. ते नाशिक येथील प्रमोद व सुधाकर कैलास पाखले यांचे वडील होत.