Private Advt

अजमेर पोलिसांना वॉण्टेड आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ : धावत्या रेल्वेत प्रवाशाला लुटल्याप्रकरणी राजस्थानमधील अजमेर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी भुसावळातून अटक करण्यात आली. शेख रईस शेख रशीद (25, रा.मुस्लिम कॉलनी, खडका रोड, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

लूट प्रकरणी दाखल होता गुन्हा
अजमेर लोहमार्ग पोलिसात प्रवाशाला लुटल्याप्रकरणी भाग पाच, गुरनं.76/2021 भादंवि कलम 380 अन्वये 19 डिसेंबर 2021 रोजी गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा संशयीत शेख रईस याने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अजमेर लोहमार्ग पोलिसांनी स्थानिक पोलिसांची मदम मागितल्यानंतर बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने हिरा हॉल, खडका रोड भागातून आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक महेश घायतड, नाईक निलेश चौधरी, दिनेश कापडणे, कॉन्स्टेबल ईश्वर भालेराव, नाईक गोपाल गव्हाळे, कॉन्स्टेबल सागर वंजारी आदींच्या पथकाने केली.