Private Advt

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना झाली करोनाची लागण

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना करोनाची लागण झाली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत त्यांनी याबाबत माहिती दिली त्याचबरोबर आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या गृहविलगीकरणात आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्या सर्वांना मी करोना चाचणी करून घेण्याचं आणि करोनाच प्रतिबंधाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन करते. आपल्या ट्वीटमध्ये भारती पवार म्हणतात,

महाराष्ट्रातले १२ हून अधिक मंत्री आणि विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांना गेल्या काही दिवसात करोनाची लागण झाली आहे. करोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यातली रुग्णसंख्या चिंताजनक असून त्यात दररोज मोठी वाढ होत आहे. देशातलं चित्रही फारसं वेगळं नाही. देशातली रुग्णवाढ पाहिली असता परिस्थिती गंभीर आणि काळजी करण्यासारखी असल्याचं दिसून येतं. अशातच आता राज्यातल्या मंत्र्यांसह केंद्रातही करोनाचा शिरकाव झालेला दिसतो