Private Advt

नाडगाव रस्त्यावर भरधाव दुचाकी धडकल्या : एक ठार, एक गंभीर

बोदवड : भरधाव दोन दुचाकी धडकून झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरूवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास बोदवड-नाडगाव रस्त्यावर झाला. या अपघातात राधु रजन बारेला (44, तुरक गोराळा, चिडीया पाणी, ता.तुरक गोराळा, जि.बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला. नाडगावकडून राधु बारेलासह अन्य एक जण दुचाकी (एम.पी.68 एम.जी.5029) ने येत असताना समोरून येणार्‍या दुचाकी (एम.एच.19 डी.क्यू .0628) मध्ये अपघात होवून एका दुचाकीवरील राधु बारेला यांचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी झाले. अपघाताबाबत नाडगाव पोलिस पाटील नितीन गोरे यांनी पोलिस स्टेशनला माहिती कळवली तर जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलवले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत बोदवड पोलिसात गुन्हा दाखल नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.