Private Advt

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी स्थानिक सुट्टी जाहीर

          जळगाव, दि. 20 (जिमाका वृत्तसेवा) :-   जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणूकांकरीता दिनांक 21 डिसेंबर, 2021 रोजी मतदान होऊन दिनांक 22 डिसेंबर, 2021 रोजी मतमोजणी आहे. सदर निवडणूक कार्यक्रमा अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीमधील 42 रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणूकीसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

                तसेच जळगाव जिल्हयातील 11 तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींमध्ये दिनांक 18 जानेवारी, 2022 रोजी मतदान होणार असून दिनांक 19 जानेवारी, 2022 रोजी मतमोजणी आहे. त्यानुसार ज्या ज्या ग्रामपंचायतींमध्ये  दिनांक 21 डिसेंबर, 2021 व दिनांक 18 जानेवारी, 2022 रोजी मतदान होणार आहे. त्या त्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात मतदानाच्या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. सदर सुट्टी उद्योग, उर्जा व कामगार विभागात येणाऱ्या कारखाने, दुकाने इ. लागु राहिल. ( राज्य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुाकने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्यगृहे, नाटयगृहे, व्यापार औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर रिटेलर्स इ.)

                अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इ. यांना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिले आहेत. असे एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रान्वये कळविण्यात येत आहे.