Private Advt

धक्कादायक ! गांधी मार्केटवरून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न

जनशक्ती क्राईम । जळगाव शहरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी सकाळी हा प्रकार घडला.

अधिक माहिती अशी कि , गांधी मार्केटच्या वरच्या मजल्यावरून एकाने सोमवारी सकाळी उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली असून यात तो व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. चोपडा तालुक्यातील कमळगाव येथील ज्ञानेश्‍वर वामन मिस्तरी (वय ४५) हा व्यक्ती शहरातील गांधी मार्केटजवळ राहणार्‍या आपल्या बहिणीकडे आला होता. या व्यक्तीवर जळगावातील दवाखान्यात उपचार सुरू असल्याने तो बहिणीच्या घरी आलेला होता.

दरम्यान, सकाळी अकराच्या सुमारास त्याने आपल्या बहिणीला आपण रूग्णालयात जात असल्याचे सांगून तो बाहेर गेला. मात्र दवाखान्यात न जाता त्याने गांधी मार्केटमध्ये वर चढून तिसर्‍या मजल्यावरून खाली उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तर, नागरिकांनी धाव घेऊन जखमी अवस्थेत असलेल्या मिस्तरी यांना रूग्णालयात दाखल केले.