22 रोजी राज्यपालांच्या हस्ते होणार भास्कराचार्य गणित नगरीच्या कोनशीलेचे अनावरण

0

आमदार उन्मेष पाटील यांच्याकडून कार्यक्रमस्थळाची पाहणी

चाळीसगाव- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री.सी विद्यासागर राव हे भास्कराचार्य गणित नगरी पाटणादेवी येथे होणार्‍या भास्कराचार्य गणित नगरी कोनशिला अनावरण व मराठी विज्ञान संमेलन उद्घाटन समारंभासाठी 22 डिसेंबर रोजी येत असून त्या पार्श्वभूमीवर गणित नगरीची संकल्पना मांडणारे चाळीसगाव तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यावेळी राज्याचे मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, विभागीय वनाधिकारी आर.आर.काळे, उपविभागीय वनाधिकारी काळे, गणित नगरी डिझायनर दिलीप गोटखिंडीकर, वास्तू विद्या विशारद शलाखा गोटखिंडीकर, वास्तू विद्या विशारद चैताली जुनागडे, गुरुकुल शाळेचे अध्यक्ष प्रा.लक्ष्मीकांत पाठक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जैन, युवा कार्यकर्ते मंदार पाठक, वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.

Copy