चाळीसगावात बालिकेवर अत्याचार : नराधम आरोपीला 4 पर्यंत पोलीस कोठडी

चाळीसगाव : अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना शहरात घडली होती. या प्रकरणी संशयीत आरोपी सावळाराम भानुदास शिंदे या आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर त्यास न्यायालयात हजर केले असता 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

अत्याचाराने शहरात उडाली होती खळबळ
नात्यातीलच तरुणाने चिमुरडीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना चाळीसगाव शहरातील एका भागात दोन दिवसांपूर्वी घडली होती. शहरातील एका भागातील एका नातेवाईकाकडे संशयीत सावळाराम भानुदास शिंदे (27) हा आला होता. शनिवारी रात्री रेल्वे स्टेशनच्या बाजूला निर्जनस्थळी नेऊन संशयिताने चिमुरडीवर अत्याचार केला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी संशयीत सावळाराम भानुदास शिंदे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयानपे 4 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.दरम्यान, पीडीत बालिकेवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.