Private Advt

भाजपा महिला आघाडीतर्फे उद्योग मार्गदर्शन मेळावा उत्साहात

1200 बचत गटाच्या सदस्य महिलांनी लावली हजेरी

पाचोरा। येथील महालपुरे मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे महिला बचत गटासाठी आयोजित उद्योग मार्गदर्शन मेळावा नुकताच उत्साहात झाला. मेळाव्याला सुमारे 1200 बचत गटाच्या सदस्य महिलांनी हजेरी लावली. अध्यक्षस्थानी खा.उन्मेष पाटील होते. याप्रसंगी प्रमुख वक्त्या व उद्योग मैत्रीण मासिकाच्या संपादिका सारिका भोईटे(पवार), भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मधु काटे, पं.स. सदस्य बन्सीलाल पाटील, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, युवानेते तथा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, डॉ.भूषण मगर, शहराध्यक्ष रमेश वाणी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा पाटील, ज्योती चौधरी, संगीता वाणी, वैशाली जडे, सुवर्णा पाटील, डॉ.अनुजा देशमुख, उषा पाटील, प्रियंका इंगळे, प्राजक्ता इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बचत गटांच्यावतीने मीनाक्षी पाटील, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सारिका भोईटे यांनी बचत गटांसाठी सहज साध्य व्यवसायांची माहिती दिली. खा.उन्मेष पाटील यांनी खान्देशातील महिलांसाठी सहज साध्य घरगुती व्यवसाय व शासनाच्या विविध योजना याविषयी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी सुनिता पाटील, फरहाना आसिफ खान, प्रभावती भडगावकर, राजश्री पाटील, ललिता पाटील, आशा चौधरी, सोनाली राजपूत, सुनिता पाटील, सिंधुबाई बडगुजर आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक युवा नेते अमोल शिंदे यांनी केले.