Private Advt

शिंदखेमध्ये एटीएम मशिन फोडत ३६ लाख लंपास

शिंदखेडा- स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडून चोरट्यांनी छत्तीस लाखावर रक्कम लांबविल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. याबाबत शहरात एकच खळबळ उडाली. सर्व पोलिस यंत्रणा याकामी तपासाला लागली आहे. श्वानपथक मागवण्यात आले आहे . याबाबत अज्ञाता विरुद्ध येथील पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

शिंदखेडा शहरात शिरपूर रोड लगत स्टेट बँक आहे. बँकेला लागूनच बँकेचे एटीएम मशीन आहे.
या मशीन मध्ये शुक्रवार दिनांक 12 रोजी 39 लाख रुपये लोड करण्यात आले होते. मात्र त्यानंतर ग्राहकांनी काही रक्कम काढली असतांना 36 लाख 86 हजार 500 रुपये मशीन मध्ये शिल्लक होते. अज्ञात चोरट्यांनी हे एटीएम मशीन प्लेझर मशिनच्या साह्याने फोडून ही रक्कम लांबविली आहे.

एटीएम मशीनच्या आजूबाजूस बँकेचे तीन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे. मात्र यातील एका कॅमेऱ्यावर चोरट्यांनी स्प्रे मारलेला आहे. तर अन्य दोघे कॅमेरे ची दिशा बदलून त्यांच्या वायरी तोडण्यात आलेल्या आहे. याशिवाय बँकेसाठी असलेल्या अलार्म च्याही वायरी चोरट्यांनी तोडलेल्या आहे. आज दुपारी बारा वाजता बँकेचे उपव्यवस्थापक अविनाश पगारे यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी त्वरित बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह येथील पोलिस ठाण्यात धाव घेतली. शिंदखेडा पोलिसांनी त्वरित दखल घेत घटनास्थळी येऊन पाहणी केली लगेचच धुळे येथून श्वानपथक मागवण्यात आले.सदर श्वान बँकेच्या आवारातच फिरले.
रस्ता सापडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सद्यस्थितीत फिंगरप्रिंट एक्सपर्ट घ्या मदतीने घटनेचा तपास सुरू आहे.