Private Advt

कर्की-बेलसवाडी रस्त्याची दुरवस्था

मुक्ताईनगर : तालुक्यातील कर्की ते बेलसवाडी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता तेच कळेनासे झाले आहे. हा रस्ता साधारण तीन किलोमीटर अंतराचा आहे. हा परीसर केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असल्याने केळी उत्पादकांना आपला माल बाजारपेठेत नेण्यासाठी वाहनांचा वापर करावा लागतो मात्र खराब रस्त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे शिवाय वाहन दुरुस्तीचा खर्चही वाढल्याने लोकप्रतिनिधींनी या संदर्भात गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.-