Private Advt

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधकाऱ्यांनी गुरुवारी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले होते. हे आंदोलन करताना पदाधिकऱ्यांनी परवानगी घेतली नव्हती. यामुळे आंदोलनकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

राष्ट्रवादीच्या पंधरा ते सोळा आंदोलन करतांना रामानंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती तरीदेखील हे आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्ष मंगला पाटील, सुनील शिंदे, कल्पना पाटील, रिजवान खाटीक, किरण राजपूत यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.