आरोग्य तपासणी शिबिरात 423 नागरीकांची तपासणी

लेवा महासंघाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रा.धीरज पाटील व प्रा.सीमा पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजन

भुसावळ : भारतरत्न, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय लेवा महसंघाचे केंद्रीय अध्यक्ष विष्णू भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली लेवा महासंघाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रा.धीरज गणेश पाटील व प्रा.सीमा धीरज पाटील यांच्या संकल्पनेतून जुना सातारा येथे आयोजित आरोग्य शिबिरात रविवारी 423 नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मशिनीद्वारे डोळ्यांची तपासणी, मशिनीद्वारे हाडांतील कॅल्शिअमची तपासणी, ब्लड प्रेशर, शुगर, ऑक्सिजन लेव्हल तपासणी, दातांची तपासणी, लहान मुलांच्या आजारांची तपासणी, कान, नाक व घसा तपासणी करण्यात आली. रक्तातील पेशी, हिमोग्लोबिन, थायरॉईड, कावीळ, मलेरिया, लिव्हर आणि किडनीच्या विविध चाचण्या करण्यात आल्या.

नामांकित डॉक्टरांचे मार्गदर्शन
डॉ.मकरंद चांदवडकर, डॉ.प्रितेश कोठारी, नेत्रम हॉस्पिटलचे डॉ.सुनील मेश्राम, डॉ.पंकज नारखेडे, डॉ.प्रहिज फालक, श्री रीदम हॉस्पिटलचे डॉ.नितीन पाटील, डॉ.जयपालसिंग पवार, महालॅबच्या ज्योती गुरव, सोपान तायडे यांचे मार्गदर्शन शिबिरास लाभले.

सामाजिक आणि राजकीय प्रतिनिधींची भेट
आमदार संजय सावकारे, माजी आमदार दिलीप भोळे, शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, नगराध्यक्ष रमण भोळे, माजी नगराध्यक्ष नीळकंठ फालक, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक डॉ.सुनील नेवे, दीपक धांडे, संतोष सोनावणे, ललित मुथा, पुरुषोत्तम नारखेडे, अजय भोळे, राजेंद्र नाटकर, प्रमोद नेमाडे, परीक्षीत बर्‍हाटे, मुकेश पाटील, अनिल भोळे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, सतीश सपकाळे, बबलू बर्‍हाटे, विनोद पाठक, नरेंद्र लोखंडे, निर्मल दायमा, सोनी ठाकूर, राकेश खरारे, देवेंद्र पाटील, सुमित बर्‍हाटे, यतीन ढाके, दिलीप गायकवाड, प्रशांत देवकर, अनिकेत पाटील, सागर वाघोदे, विशाल ठोके, सुरज चौधरी, सुरज पाटील, पवन नाले भुसावळातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी शिबिरास भेट दिली.

20 रुग्णांची होणार शस्त्रक्रिया
शिबिरात अनेक नागरीकांना व्याधी असल्याचे निदर्शनास आले. 20 गरजवंत नागरीकांची नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त सामाजिक आरोग्य सुदृढ करण्याचा प्रयत्न शिबिरातून केला असल्याचे शिबिराचे संयोजक व अखिल भारतीय लेवा महसंघाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रा.धीरज गणेश पाटील यांनी सांगितले.

Copy