Private Advt

भुसावळात हद्दपारी आदेशाचे उल्लंघण : एकाला अटक

भुसावळ : हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण करीत शहरात आलेल्या अमोल उर्फ चिन्ना शाम खिल्लारे याला शहर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अटक केली. खिल्लारे हा समता नगरात आल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना मिळाल्याने त्यांनी सहा.पोलीस निरीक्षक संदीप दुुणगहू यांना माहिती दिल्यानंतर त्यांच्यासह पोलीस कर्मचारी समाधान पाटील व अन्य कर्मचार्‍यांनी शुक्रवारी रात्री 3.20 वाजता समता नगर भागात कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी चिन्ना यास दोन वर्षांसाठी हद्दपार केले असून हा आदेश धुडकावत तो शहरात आल्याने त्याच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.