काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधींना धक्काबुक्कीच्या निषेधार्थ फैजपुरात रास्ता रोको : मोदी, योगी सरकारचा निषेध

फैजपूर : उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी येथे रविवारी घडलेल्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की करून ताब्यात घेतले तसेच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची हाकलपट्टी करून त्यांच्या मुलाला अटक करावी या मागणीसाठी यावल-फैजपूर काँग्रेसच्या वतीने येथील सुभाष चौकात मंगळवारी सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

प्रियंका गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध
लखीमपूर खेरी येथे रविवारी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशीष मिश्रा यांच्या वाहनाने काही शेतकर्‍यांना गाडीखाली चिरडले. त्यात आशिष मिश्राने गोळीबार केला त्यात एक शेतकरी तिथेच गतप्राण झाला, त्यानंतर आक्रमक झालेल्या दंगलीत सात ते आठ शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. या हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की करीत ताब्यात घेतले. या घटनेच्या निषेधार्थ यावल व फैजपूर काँग्रेसच्यावतीने केंद्र शासनाचा व उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करण्यात आला. मोदी सरकार, योगी सरकार हाय हाय अशा घोषणा देण्यात आल्या. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी आपल्या पदाचा त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यांचा आंदोलनात सहभाग
रास्ता रोको आंदोलनात आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परीद सदस्य तथा काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, नगरसेवक केतन किरंगे, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, नगरसेवक तथा गटनेते कलिम मण्यार, शेतकी संघाचे चेअरमन सुनील फिरके, यावल शहरप्रमुख कादीर खान, फैजपूर शहर प्रमुख शेख रीयाज, पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी, पंचायत समिती सदस्या कलीमा तडवी, ज्येष्ठ व माजी कार्यकर्ते ओंकार वामन सराफ, माजी नगरसेवक मेहबूब पिंजारी, युवा शहराध्यक्ष वसीम तडवी, सेवा दल काँग्रेसचे कमिटीचे भरत कुंवर, चंद्रशेखर चौधरी, लियाकत अली, मुख्याध्यापक गणेश गुरव, योगेश भावसार, संजय गांधी निराधार योजनेचे जावेद जनाब, युवक तालुकाध्यक्ष वसीम जनाब, रामराव मोरे, आमोदा माजी सरपंच राजेंद्र पाटील, किरण निंबाळे, इरफान खान, हर्षल दाणी, पिंटू हंसकर, चंद्रकला इंगळे, सीमा गुरव, पुष्पा झाल्टे, ललिता चौधरी, अमोल भिरुड, आसिफ मेकॅनिकल, झिया सर, यासह यावल-फैजपूर परीसरातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Copy