भुसावळ बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

भुसावळ : भुसावळ बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांची शनिवारी सायंकाळी तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी प्रशासकीय कारणास्तव बदली झाल्याचे सांगत बदलीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पोलीस अधीक्षक म्हणाले ; अशा पद्धत्तीने कारवाई होणार
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, प्रशासकीय कारणास्तवर निरीक्षक दिलीप भागवत यांना कंट्रोल अ‍ॅटेच करण्यात आले असून भुसावळ शहर निरीक्षक प्रताप इंगळे यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला आहे. नशिराबाद खून प्रकरणात प्रिव्हेन्शन झाले नसल्याचे त्यांनी सांगत यापुढे देखील अशाच पद्धत्तीने कारवाई होणार असल्याचे ते म्हणाले.

Copy