Private Advt

जळगाव शहरात घरात घुसून तरुणावर गोळीबार

जळगाव : शहरातील कांचननगर परिसरात राहणाऱ्या आकाश सपकाळे या तरुणावर गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास चौघांनी घरात घुसून गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनास्थळी चार ते पाच राऊंड फायर करण्यात आले.

जळगाव शहरातील कांचननगर परिसरात असलेल्या समर्थ बैठक हॉलजवळ आकाश मुरलीधर सपकाळे हा तरुण परिवारासह राहतो. गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या चार ते पाच जणांपैकी एकाने त्याच्या घरात प्रवेश करून त्याच्यावर गोळीबार केला. घरात ४ काडतूस पडल्या असून घरा बाहेर १ गावठी कट्टा आणि १ काडतूस पडले आहे. घटनास्थळी शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे पथकासह पोहचले असून तपास सुरू आहे. दरम्यान, ४ हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून हल्ल्यात २ पिस्तुलाचा वापर झाल्याचे समजते. वाद पूर्व वैमनस्यातून झाल्याचा अंदाज आहे.