Private Advt

यावलमध्ये पोलिसांशी हुज्जत : एकाला अटक

यावल : तालुक्यातील साकळी येथे गावठी हातभट्टी दारू विक्रेत्यावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर एकास ताब्यात घेतल्याने संशयीतांच्या मुलांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घालत शासकिय कामात अडथळा निर्माण केल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर कोळी यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार बुधवारी सायंकाळी यावल पोलिसांच्या पथकाने साकळीत दारू अड्ड्यावर छापा टाकला व एक हजार 400 रुपयांच्या मुद्देमालासह सुकलाल रावजी वडर यास ताब्यात घेतले. यावेळी वडर यांची मुले पिंटू सुकलाल वडर व राजेश सुकलाल वडर हे आल्यानंतर आपल्या वडीलांवर कारवाई केल्याने मोठ-मोठ्याने आरडा-ओरड करीत आत्ताच माझ्या वडिलांना सोडा असे सांगत थेट पोलिस ठाण्यात पोलिसांनी शिविगाळ केली व तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही नोकरी करतात ते आम्ही पाहुन घेवु अशी धमकी देत शासकिय कामात अडथळा निर्माण केला. तिघांविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत.