Private Advt

बीएचआर गैरव्यवहारप्रकरणी मुख्य सूत्रधार सुनील झंवर अखेर गजाआड

बीएचआर सहकारी पतसंस्था गैरव्यवहार प्रकरण

जळगाव । बीएचआर सहकारी पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार संशयित आरोपी सुनील झंवर याला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटे नाशिकमध्ये अटक केली. आता या प्रकरणातील बर्‍याच प्रकारचे आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येऊ शकती. बीएचआर पतसंस्थेमधील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी 27 नोव्हेंबर 2020 रोजी पुणे येथे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात तत्कालिन अवसायक जितेंद्र कंडारे याच्यासह व्यावसायिक सुनील झंवर याचावरही आर्थिक घोटळ्याचा संशय आहे. हा गुन्हा दाखल झाल्यापासून झंवर हा पसार झाला होता. त्याचे जामीन अर्ज न्यायालयाने अनेकदा नाकारले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही महिन्यांनी झंवर यास अटकेपासून 15 दिवस दिलासा मिळाला होता. त्यास बर्‍याच कालावधीनंतर रविवारी पहाटे पोलिसांनी नाशिक येथे अटक केली. तसेच सुनील झंवर याचे पूत्र सूरज झंवर यांना या अगोदर जामीन मिळाला आहे. विवेक ठाकरे व सुजीत वाणी यांनाही जामीन मिळालेला आहे.