जळगावात पूर्ववैमनस्यातून पिता-पूत्रावर धारदार शस्त्राने वार

रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव । हरीविठ्ठलनगर रोडवरील रुख्मिणीनगरात पूर्ववैमनस्यातून एका तरुणासह त्यांच्या मुलावर गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास धारदार शस्त्राने वार झाले. यात पिता-पूत्र जखमी झाले. याबाबत दोन जणांविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अक्षय माळी (रा.रुख्मिणीनगर) आणि त्याच्या एका अनोळखी मित्राने पूर्ववैमनस्यावरुन रुख्मिणीनगरात जयवंत हरीश्वर महाजन (वय 38, रा.किसनरावनगर) यांना शिवीगाळ व धमकी देत धारदार शस्त्राने वार केले. यात जयवंत महाजन व त्यांचा मुलगा सोहम महाजन (माळी) जखमी झाले. याबाबत जयवंत महाजन यांनी दोघांविरुद्ध फिर्याद दिली. तपास पोलीस नाईक विनोद सोनवणे करीत आहेत.