Private Advt

प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी गावंडे

अकोला । प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी लोकजागर मंचाचे संस्थापक अनिल गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांनी गावंडे यांना नियुक्तीचे पत्र दिले. गावंडे यांनी लोकजागर मंचाच्या माध्यमातून सामाजिक, सहकार, शेती, महिला अशा विविध क्षेत्रात काम चालविले आहे. तरुणांची फळी उभी केली आहे. तीन महिन्यांपासून ते प्रहारशी जुळले होते. त्यांचा औपचारिक प्रवेश मुंबईत झाला. त्यानंतर बच्चू कडू यांनी त्यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केले. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ, सचिव कमलाकर पवार, पुरुषोत्तम आवारे पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.