Private Advt

महागाई भत्त्यात ११ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १७ टक्क्यांची घसघशीत वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत महागाई भत्त्यात तब्बल ११ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई भत्ता १७ टक्क्यांवरून २८ टक्क्यांवर गेला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे महागाई भत्त्याचे तीन हफ्ते प्रलंबित आहेत. सरकारने करोनामुळे महागाई भत्त्याला स्थगिती दिल्यानं हे हफ्ते प्रलंबित असून, सप्टेंबरपासून कर्मचाऱ्यांच्या हातात घसघशीत पगार येणार आहे.

गेल्या वर्षी करोना संक्रमणाच्या सुरुवातील केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळानं कर्मचाऱ्यांना दिला जाणाऱ्या महागाई भत्त्याचे दोन हप्ते रोखण्याचा निर्णय घेतला होता. महागाई भत्याचा हप्ता प्रत्येक सहा महिन्यांनी जारी केला जातो. वर्षात पहिल्यांदा १ जानेवारी आणि दुसरा १ जुलै रोजी महागाई भत्ता जारी केला जातो. आज घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१ पासून लागू होणाऱ्या तीन हप्त्यांवरील स्थगिती मागे घेण्यात आलीय. यानंतर तीन हफ्ते मिळून एकूण ११ टक्के वाढ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. म्हणजेच महागाई भत्त्याचा सद्य दर १७ टक्क्यांहून वाढून २८ टक्क्यांवर करण्यात आलाय. सरकारच्या या निर्णयाचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसंच पेन्शनधारकांनाही होणार आहे.