आधी ५ जणांना संपवला मग स्वतः केली आत्महत्या

नागपुर – नागपुरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात आचार्यजनक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर हत्या करणाऱ्या त्या इसमाने स्वतःही आत्महत्या केली. नागपुरातल्या पाचपावली भागात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. दरम्यान घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आलोक माथुरकर याने आपली पत्नी, मुलगा, मुलगी यांची हत्या केली. नंतर तिथेच थोड्या अंतरावर राहणाऱ्या सासरी जाऊन सासू आणि मेहुणीची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो पुन्हा आपल्या घऱी आला आणि गळफास घेत आत्महत्या करुन जीवन संपवलं.

रविवारी रात्री या हा सगळा प्रकार घडल्याचं समजत आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. कौटुंबिक कलहातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.