काँक्रीटीकरण ! 6 लाख रुपयांचे स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कामाचे भूमिपूजन

प्रतिनिधी अमळनेर- 

अमळनेर शिरपूर रस्त्यावरील भरवस रेल्वे बोगद्याजवळ आता दोन्ही बाजूला काँक्रीटीकरण कामाचे स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
6 लाख रुपयांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत भरवस गावाजवळ रेल्वे बोगद्याच्या उजव्या व डाव्या बाजूला काँक्रीटीकरण काम या मुळे होणार आहे. सदर रस्ता गेल्या पाच वर्षात अत्यंत दयनीय झालेला होता. यामुळे रेल्वे बोगद्याजवळ पावसाळ्यात पाणी साचून बोगद्याखाली मोठं मोठे खड्डे निर्माण झाले होते व आजूबाजूला पाणी साचल्यामुळे दोन्ही बाजुला पूर्ण रस्ता कच्चा व मुरदाळ झाला होता. बोगद्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला उतार असून यामुळे रस्त्यावरील दोन्ही भागातील पाणी थेट रेल्वे बोगद्याखाली साचत असे यामुळे पावसाळ्यात मोटारसायकल स्वार व इतर वाहने तासनतास खोळंबून असत यामुळे दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प होत असे. यामुळे छोटे मोठे अपघातात होऊन वाहनचालक जखमी होत यासाठी आमदार अनिल पाटील यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे काम केले आहे. गेल्यावर्षी कोरोना असल्याने विकासकामे ठप्प होती यंदा काही प्रमाणात कामे सुरू झाले असल्याने यंदा हे काम आपल्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर केले व त्याचे आता भूमिपूजन देखील झाले यामुळे परिसरातील वाहन चालक, बैलगाडी मालक, शेतकरी यांचा मुख्य प्रश्न सुटला आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक सदस्य संभाजी लोटन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस डाॅक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डाॅ.रामराव पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष गौरव पाटील, लोणचारम सरपंच विवेक पाटील, लोण खु चे सुशिल पाटील, झाडी सरपंच भुपेंन्द पाटील, भरवस सरपंच अशोक पाटील यांच्या सह नितीन महारु पाटील, राजेंद्र तुकाराम पाटील, दिलीप साहेबराव पाटील, प्रकाश शांताराम पाटील, संजय माधवराव पाटील, देविदास हिरामण पाटील, अशोक बाबुराव पाटील, बाळु हैंबत पाटील, मंगेश साहेबराव पाटील, नंदू ठाकरे, भिला ओंकार पाटील, प्रकाश रामदास पाटील, श्रीकांत सिताराम पाटील, रोहित दिनेश पाटील, हेमंत अशोक पाटील, गोपाल प्रकाश पाटील, नाना उखर्डू पाटील, प्रकाश मन्साराम पाटील, नारायण पुंडलिक पाटील, उखर्ड रुपला मिस्तरी, सोनू मधुकर पाटील तसेच एकलहरे येथील माजी सरपंच फत्तेलाल अर्जुन पाटील, माजी उपसरपंच सुनिल पाटील, प्रफुल्ल सीताराम पाटील, सजन पाटील, कीर्तीकुमार पाटील, जगदीश पाटील, शुभम पाटील व परिसरातील ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.
Copy