सर्वात मोठा दिलासा! शहरात केवळ एक कोरोना बाधित

जळगाव – गेल्या तीन महिन्यापासून कोरोनाच्या वेळख्यात असलेल्या जळगाव शहराला आज एक समाधानाची आणि तितकीच आनंदाची बातमी मिळाली आहे. ती म्हणजे जळगाव शहरात आज केवळ  एकच रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. प्रशासनाने लावलेल्या कडक निर्बंधांमुळे आणि नागरिकांनी बजावलेल्या शिस्तीच्या वागणुकीमुळे हे शक्य झाले. असे झाले असले तरी नागरिकांनी यापुढे अशीच शिस्त  पाळली तर लवकरच जळगाव शहर कोरोना मुक्त होईल.  शहरात तिसरी लाट ही येणार नाही असे जाणकार सांगत आहेत.