गाळेधारक बेमुदत साखळी उपोषण करणार

जळगाव – जो पर्यंत आम्हा गाळेधारकांना न्याय मिळत नाही तो पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालया समोर शहरातील गाळेधारक बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याची माहिती ‘जनशक्ती’ शी बोलतना शांताराम सोनावणे यांनी दिली.मंगळवार दिनांक १५ पासून गाळेधारक जिल्हाधिकारी कार्लायासमोर बेमुदत साखळी उपोषण करणार आहेत. यावेळी त्यांना न्यायमिळे पर्यंत हे उपोषण चालणार आहे.
१२ मे रोजी झालेल्या महासभेत गाळेधारकांचा प्रशासकीय प्रस्ताव बहुमताच्या जोरावर गाळेधारकांचा प्रशासकीय प्रस्ताव निकाली काढण्यात आला. यामुळे भाडे थकीत असलेल्यांचे गले जप्त करण्यात येणार आहे.याच्या विरुद्ध गाळेधारक उपोषण करणार आहेत.