Private Advt

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ऑनलाइन गर्भसंस्कार कार्यशाळा व जाहीर व्याख्यान

जळगाव – सोहम डिपार्टमेंट ऑफ योग् अँड नॅचरोपॅथी, मूळजी जेठा महाविद्यालय,जळगाव आयोजित ऑनलाइन गर्भसंस्कार कार्यशाळा दिनांक १६ जून  ते ३० जून सायंकाळी पाच ते सहा या वेळेत  होणार आहे.  या कार्यशाळेच्या निमित्ताने जळगाव येथील  तीस वर्षांचा अनुभव प्राप्त प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. तिलोत्तमा गाजरे यांचे गर्भ धारणा,प्रसूती व प्रसूती पश्चात समस्या निवारण वैज्ञानिक दृष्टीकोन यावर दिनांक १६ जून रोजी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत जाहीर व्याख्यानाचे आयोजन ऑनलाइन माध्यमाने करण्यात आलेले आहे. ही कार्यशाळा गर्भारपणाच्या कोणत्याही महिन्यात करता येते. या कार्यशाळेत गर्भवती स्त्रियांना सुलभ प्रसूतीसाठी योगासने, प्राणायाम तसेच आहार व मानसिक शांतीसाठी योग निद्रा यांचा अभ्यास दिला जाणार आहे. त्याचबरोबर विविध मंत्रांच्या द्वारे बाळावर मंत्रसंस्कार तसेच गर्भ संकल्प ही यात दिला जाणार आहे. तसेच जाहीर व्याख्यानाचा सुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी प्रा. गीतांजली भंगाळे यांच्याशी 9823361689  व योग विभाग 9112288110 या नंबर वर संपर्क साधावा. या गर्भसंस्कार कार्यशाळेचा लाभ जास्तीत जास्त गर्भवती स्त्रियांनी घेऊन ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी व घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती’ या उक्तिला सफल करण्यासाठी लाभ घ्यावा. तसेच ही कार्यशाळा फक्त गर्भवती स्त्रियांना करता येते त्यामुळे सुसंस्कारी, संस्कारक्षम, आरोग्यपूर्ण व निरोगी भावी पिढीसाठी जास्तीत जास्त गर्भवती स्त्रियांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.  असे आवाहन सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथील संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी केले आहे.