Private Advt

एरंडोल येथिल इसमालाही चिकटू लागली स्टीलची भांडी व नाणी

 

एरंडोल: विद्यानगरातील रहीवासी पी.जी. पाटील यांनी शनीवारी ‘अंगाला चिकटू लागली स्टीलची भांडी, ही बातमी वर्तमानपञात वाचल्यावर पोहे खात असतांना त्यांनी स्टीलचा चमचा अंगाला लावला असता तो चिकटल्याचा त्यांना अनुभव आला. त्यानंतर त्यांनी १रू.,५रू.,व १० रूपयांची नाणी अंगाला चिकटवून पाहीली असता ती देखिल चिकटली हा अद्भूत प्रत्यय आल्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार राहीला नाही.
विशेष हे की चिकटलेली नाणी/वस्तू खाली पडते की काय..? हे पाहण्यासाठी ते किचनमध्ये ईकडे-तिकडे चालत गेले,चालल्यावर सूद्धा वस्तू व नाणी खाली पडल्या नाहीत.
कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर हा प्रकार आढळुन आला. कॉलनी परीसरात सध्या या विषयाबाबत कुतूहल पसरले आहे.

पी.जी. पाटील हे खडके खुर्द येथील महेंद्रसिंग पाटील माध्यमिक विद्यालयात वरीष्ठ लिपीक म्हणून कार्यरत आहेत. ९मार्च२०२१ रोजी त्यांनी ‘कोविशिल्ड, लसीचा पहीला डोस व ५एप्रिल रोजी दुसरा डोस घेतला त्यांची २१ वर्षे सेवा झालेली आहे. वस्तू चिकटण्याच्या या प्रकाराबाबत शासनाने दखल घ्यावी व त्यामागे वैद्यकीय कारण कोणते आहे..? या बाबत खुलासा होणे आवश्यक असल्याचे पि. जी. पाटील यांनी बोलतांना सांगीतले.