जळगाव जिल्हा दौऱ्यापूर्वी फडणविसांनी घेतली पवारांची भेट

जिल्हात आलेल्या वादळानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उद्या जिल्हा दौरा करत आहेत. मात्र त्या आधी त्यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या भेटी नंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा देखील झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचा फोटो ट्विट करून, माहिती दिली आहे. “माजी केंद्रीयमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.” असं फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1399269562055479300/photo/1?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1399269562055479300%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra-news%2Fbig-news-devendra-fadnavis-met-sharad-pawar-msr-87-2485365%2F