“शावैम” मध्ये अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवार, ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रसंगी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, डॉ. संजय बनसोडे, डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी आर. यु. शिरसाठ, ज्ञानेश्वर डहाके, एन. टी. वाघ, आर. एन. धाकड, महेश गुंडाळे, अनिल कापुरे, शाम दुसाने, राजेंद्र वैद्य, लीलाधर कोळी आदी उपस्थित होते.