महावितरण कंपनीच्या कामगीरीने ग्राहकांचे जिंकले मन

चाळीसगाव: तालुक्यात २८ रोजी शुक्रवारच्या सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने वादळीवाऱ्यासह  जोरदार आगमन झाल्याने काही भागात झाडे  वायरींवर पडल्याने  वीजपुरवठा हा खंडित झाला होता. मात्र महावितरणच्या कर्मचार्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन वीजपुरवठा पुर्ववत केल्याने याबाबत सर्वत्र कौतुक होत आहे.
चाळीसगाव तालुक्यात शुक्रवार रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने वादळीवाऱ्यासह जोरदार आगमन केला. परिणामी तालुक्यातील बहुतांश भागांपैकी सांगवी येथेही झाडं हा वायरींवर पडल्याने वीजपुरवठा हा खंडित झाला होता. मात्र मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांनी त्वरीत आपल्या सहकाऱ्यांना बोलावून घटनास्थळी धाव घेतली. रात्री ९:०० ते ३:३० वाजे दरम्यान पदाधिकारीसह कर्मचार्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करून वीजपुरवठा सुरळीत केला. या प्रशंसनीय कामगीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी सांगवी ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्रसिंग राठोड यांचीही मोलाची मदत मिळाली. महावितरण कंपनीने अभुतपुर्व केलेल्या या कामगीरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. सांगवी येथे महावितरण कंपनीचे उपकेंद्र असल्याने सांगवी बरोबर लोणजे, बोढरे, तळोंदे, पार्थडे व पिंपरखेड आदी ठिकाणी वीजपुरवठा खंडित होता. मात्र महावितरण कंपनीने वेळीच तत्परता दाखविल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला नाही. यावेळी मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे, कार्यकारी उप अभियंता हर्षवर्धन जगताप, सहायक अभियंता विशाल सोनवणे, गुडगे, महावितरण कर्मचारी सचिन जाधव, रवि राठोड व सरपंच महेंद्रसिंग राठोड व ग्रामस्थ उपस्थित होते.