पालकमंत्री गुलाबराव पाटील शनिवारी मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील नुकसानीची पाहणी करणार

जळगाव – राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे शनिवार, दि. 29 मे, 2021 रोजी जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

शनिवार, दि. 29 मे रोजी सकाळी 8.00 वाजता मुक्ताईनगरकडे प्रयाण, सकाळी 9.30 वाजता मुक्ताईनगर येथे आगमन व राखीव. सकाळी 10.00 वाजता मुक्ताईनगर तालुक्यातील मेंढाळदे, उंचदा, शेमळदे व इतर ठिकाणी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व शेतकऱ्यांशी भेटी. सकाळी 12.00 वाजता रावेर तालुक्यातील विटवा, निंबोल, ऐनपुर व इतर ठिकाणी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व शेतकऱ्यांशी भेटी. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4 वाजता धरणगाव तालुक्यातील नियोजित कार्यक्रमाना उपस्थिती व सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.