विनाकारण फिरणार्‍यांची चौकाचौकात तपासणी

जळगाव- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विनाकारण फिरणार्‍यांची शहरातील चौकाचौकांमध्ये तपासणी सुरू आहे. विनामास्क व नियमांचे उल्लंंघन करणार्‍यांवर पोलीस कडक कारवाई करीत आहेत.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात 31 मेपर्यंत अत्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहे. कडक निर्बंधाची अमलबजावणी सोमवारपासून अधिक काटेकोरपणे करण्यात येतेय. शहरातील चित्रा चौक, टॉवर चौक, घाणेकर चौक, शनिपेठ, नेहरू चौक, रेल्वे स्थानक परिसर, शिवतीर्थ मैदान, स्वातंत्र्य चौक, नवीन बसस्थानक परिसर, आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौफुली, अजिंठा चौफुली, पांडे डेअरी चौक, बेंडाळे चौक, काशिनाथ लॉज आदी भागात पोलिसांनी कडक कारवाई केली. या कारवाईप्रसंगी शहरातील विविध भागामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.

Copy