भादली येथील मजुराची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव- तालुक्यातील भादली येथील 45 वर्षीय प्रौढ मजुराने बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
किशोर रमेश नारखेडे (वय 45) हे वृद्ध आईसोबत राहत होते. किशोर नारखेडे यांनी राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आई सकाळी उठल्यानंतर मुलाने गळफास घेतल्याचे दिसले. याबाबत पोलीस पाटील ढाके यांनी नशिराबाद पोलिसांना खबर दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शवविच्छेदन झाले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.