एमआयडीसी परिसरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण

जळगाव- एमआयडीसी परिसरातील 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीला फूस लावून तिचे अपहरण झाले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
बीड जिल्ह्यातील एक कुटुंब जळगावातील एमआयडीसीमधील एका कंपनीत कामानिमित्त त्या परिसरात राहत आहे. या कुटुंबातील सदस्य 11 मे रोजी जेवण करुन रात्री 11 वाजेच्या सुमारास झोपलेे. यानंतर अयोध्यानगरातील तुषार चौधरी नावाच्या तरुणाने या मुलीचे अपहरण केले. याबाबत मुलीच्या आईने फिर्याद दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात तुषार चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहेत.