सामाजिक शांततेला अडसर ठरणार्‍या 18 जणांची हद्दपारी

धुळे : सामाजिक शांततेला धोका ठरू पाहणार्‍या 18 गुन्हेगारांना जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी हद्दपार केले आहे. या कारवाईने गुन्हेगारांच्या गोटात धडकी भरली आहे. 18 पैकी 13 जणांना एक वर्षासाठी तर पाच जणांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले.

यांची झाली हद्दपारी
देवपूर पोलिस स्टेशन अंतर्गत 13 जणांना एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले. त्यात टोळी प्रमुख सागर सुनील कांबळे (26, रा. नेहरुनगर, वाडीभोकर रोड, धुळे) व टोळीतील ऋषिकेश नरेंद्र भांडारकर (रा.राजेंद्र नगर, गोंदूर रोड), लखन ज्ञानेश्वर लोणारी (रा.विटाभट्टी देवपूर), प्रफुल्ल दिनकर भोई (रा.नगावबारी, देवपूर), गौरव उर्फ जम्ब्या रमेश नरोटे (रा.नेहरु नगर, वाडीभोकर रोड, धुळे), अजय अमृत कांबळे (रा.नेहरु नगर, देवपूर), शुभम राजेंद्र देशमुख (रा.बिलाडी रोड, देवपूर), अविनाश उर्फ पप्पू सुभाष अहिरराव (रा.न्हावी कॉलनी, देवपूर), राहुल प्रदीप सूर्यवंशी (रा.मोचीवाडा देवपूर), बापू उर्फ अशोक रामदास गांगुर्डे (रा.नेहरु नगर, देवपूर, धुळे), शुभम संजय भामरे (रा.नेहरु नगर, देवपूर), अनिल त्र्यंबक लोणारी (रा. साईबाबा नगर, देवपूर), भैय्या माळी उर्फ धनंजय विकास सूर्यवंशी (रा. मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर), या 13 जणांना एक वर्षाच्या मुदतीकरीता धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, चाळीसगाव आणि नाशिक जिल्ह्यतील मालेगाव तालुक्यातून हद्दपार करण्यात आले.

पाच जण जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार
आझादनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टोळीप्रमुख मनोज दिलीप वाडीले, (रा.गायकवाड चौक, धुळे), रविंद्र उर्फ टिल्लू गबा सोनवणे (रा.जुने धुळे), राकेश दिलीप वाडीले (रा.गायकवाड चौक, जुने धुळे), गौतम अशोक अंगरे (रा.स्वामीनारायण कॉलनी, बाजार समिती परिसर, धुळे), भटू बडगुजर उर्फ मनोज रघुनाथ सूर्यवंशी (रा.सुर्योदय कॉलनी, वरखेडी रोड धुळे) या पाच जणांना धुळे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले.

 

Copy