पुढील आदेश येई पर्यंत शहरात लसीकरण नाहीच !

जळगाव – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने एक मेपासून संपूर्ण भारतात 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. जळगाव शहरात एक व दोन मे असे दोन दिवस लसीकरण झाले मात्र लसीच्या तुटवड्यामुळे पुढील काही दिवस म्हणजेच जोपर्यंत शासनाचे आदेश येत नाही तोपर्यंत या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नसल्याची माहिती महापालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी राम रावलानी यांनी जनशक्तीशी बोलताना दिली