चिंचोलीत जुन्या वादातून हाणामारी दोघं गटातील 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव- तालुक्यातील चिंचोली येथे जुन्या कारणावरुन दोन कुटुंबामध्ये वाद उफाळून हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटाने परस्परांविरुद्ध फिर्याद दिली. त्यामुळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
विशाल निंबा वाघ यांच्या घरात 10 जणांनी अनधिकृतरित्या प्रवेश केला. जुन्या वादाची कुरापत काढून वाघ यांच्यासह त्यांच्या आई व मुलास मारहाण झाली. संतप्त जमावातील काही जणाने मिरचीची पूड फेकून वाघ यांच्या आईच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली. याबाबत सचिन सुरेश ढाकणे, राजेश मधुकर घुगे, संजय मधुकर घुगे, संजय पुना घुगे, अक्काबाई सुरेश ढाकणे, सुरेश काशिनाथ ढाकणे, लताबाई संजय घुगे, प्रियंका सचिन ढाकणे, राजू मधुकर घुगे व अनिल वाघ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला.
दुसर्‍या गटातर्फे अलकाबाई सुरेख ढाकणे यांनी फिर्याद दिली. अंगणात खरगटे पाणी फेकले व जुन्या वादातून हाणामारी झाली. यात अलकाबाई यांच्यासह त्यांचा मुलगा व भावास मारहाण झाली. यासंदर्भात विशाल निंबा वाघ, भय्या निंबा वाघ व मुन्नाबाई निंबा वाघ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.