रुग्णालयातून पसार झालेल्या कैद्यास अटक

जळगाव- जिल्हा कारागृहातून उपचारासाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातून पो लिसांना चकवा देत पसार झालेल्या कैद्यास पोलिसांनी अटक केली. या कैद्यास पोलिसांनी रुग्णालयाजवळील एका उसाच्या शेतात पकडले. याप्रकरणी पोलिसांनी गोपनीयता पाळली. परंतु, पाच दिवसांनी हा प्रकार उघडक ीस आला.
जिल्हा कारागृहातील कैदी जोसेफ राजू अब्राम्ह याला साकेगावजवळील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महा विद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी 20 एप्रिल रोजी दाखल केले. या कैद्याला श्‍वास घेण्यास त्रास व्हायचा. त्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीतील अहवाल निगेटीव्ह आला. त्यास डॉक्टरांनी आपत्कालीन विभागात दाखल केले. त्याच्यावर देखरेख करण्यासाठी पोलीस मुख्यालयातील कॉन्स्टेबल जितेंद्र रोहिदास पांडव, विनोद सोनवणे यांची ड्युटी होती. पोलीस वॉर्डात जावून कैद्यावर नजर ठेवत होते. दुसर्‍या दिवशी 21 रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास पोलीस कैद्याला बघण्यासाठी वॉर्डात गेले असता, कैदी बेडवर आढळला नाही. याबाबत दोघं पोलिसांनी मुख्यालय व नशिराबाद पोलीस ठाण्यात कळविले. यासंदर्भात कळताच पोलिसांच्या ताफ्याने रुग्णालयाजवळील शेतात शोध मोहीम सुरू केली. पोलिसांनी या कैद्यास एका उसाच्या शेतात पकडले. त्यास अटक करण्यात आली. कॉन्स्टेबल जितेंद्र पांडव यांनी फिर्याद दिली. त्यावरुन नशिराबाद पोलीस ठाण्यात कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Copy