पिंप्राळा हुडकोतील बालिकेचा संशयास्पद मृत्यू

आई-वडिलांसह चौघांना घेतले ताब्यात

जळगाव- पिंप्राळा हुडकोमधील 11 वर्षीय बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या बा लिकेचा मृतदेह तिच्या आई-वडिलांनी परस्पर दफन केला. याप्रकरणी पोलिसांनी त्या बालिकेच्या आई-व डिलांना चौकशीकामी ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनेच्या माहितीबाबत चौकशी केली असता त्या दोघांच्या जबाबात विसंगती आहे.
या घटनेबाबत बालिकेच्या आईचे वडील म्हणजे त्या मुलीचे आजोबा व मामाला कळताच त्यांना मृत्यूसंदर्भात संशय आला. आजोबा व मामांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी त्या बालिके चा मृतदेह उकरुन काढला. तिच्या अंगावर काही खुणा आहे का? व इतर माहिती पोलीस घेत आहेत. याबाबत पोलीस अधिक माहिती घेत असून अद्याप रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही.
——