कोविडमुळे मृत्यू झालेल्यांना महापालिकेने मोफत लाकूड उपलब्ध करून द्यावे

भाजपा जिल्हा अध्यक्ष दिपक सुर्यवंशी

जळगाव-  शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे.न बऱ्याच लोकांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असून बरेच जण कोविडमुळे मृत्युमुखी पडत आहेत. तरी म.न.पा. मार्फत स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लाकडे मोफत देण्यात यावे. असे निवेदनंभाजपा जळगाव जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी पालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांना दिले.

तसेच जळगाव शहर म.न.पा. अंतर्गत सी.सी.सी सेंटर येथे डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली कोविड-१९ रुग्ण उपचार घेत असून सध्या जळगाव शहरात पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. अश्या परिस्थितीत जळगाव शहरात सर्व खाजगी रुग्णालये फुल असून शहरातील नागरिकांचे ऑक्सिजन बेड साठी अतोनात हाल होत आहे. तरी अश्या गंभीर अवस्थेत सुद्धा जळगाव शहर म.न.पा. च्या सी.सी.सी. सेंटर ला डॉक्टरांच्या देखरेखी खाली असून सुद्धा तेथे ऑक्सिजन बेडची व्यवस्था होत नाही. तरी आपण सी.सी.सी. सेंटर ला किमान ५० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करावी अशी हि मागणी केली. 

 या प्रसंगी आ सुरेश भोळे, म न पा जळगाव स्थाइ सभापती राजेंद्र घुगे पाटील, गटनेते भगत बालाणी, जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, महेश जोशीं उपस्थित होते.

Copy