चाळीसगाव ग्रामीणच्या दहा पोलिसांची पदोन्नती

चाळीसगाव: जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यातील दहा कर्मचार्यांना बढती देण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आज पोलिस निरीक्षक यांनी या दहा पोलिसांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी नुकतीच जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पोलिसांची बढतीचे निर्देशन दिले आहे. त्यात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यातील दहा पोलिसांना बढती देण्यात आली आहे. पोलिस हवालदार म्हणून कार्यरत राजेंद्र साळुंखे, किशोर दाबाडे, मनोज पाटील व भालचंद्र पाटील यांना सहायक फौजदार म्हणून तर पोलिस नाईक म्हनून कार्यरत गणपत महिरे, दत्तात्रय महाजन, कैलास पाटील व कांतीलाल सोनवणे यांना पोलिस हवालदार तर शिपाई म्हणून कार्यरत संदीप माने व ज्ञानेश्वर वाघ पोलिस नाईक म्हनून बढती देण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर चाळीसगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सर्वांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी कोरोना नियमांचे पालन करून शुभेच्छा दिल्या गेल्या.