सावदा रेल्वे स्टेशनवर रेल्वे डब्यांचे कोविड आयसोलेशन उभारा

सावदा शहर शिवसेनेची मागणी : रुग्णांना मिळणार दिलासा

सावदा : सावदा रेल्वे स्टेशनवर रेल्वे डब्यांचे कोविड आयसोलेशन/ऑक्सिजन सेंटर उभारावे, अशी मागणी सावदा शहर शिवसेनेतर्फे खासदा रक्षा खडसे यांना देऊन करण्यात आली.

झपाट्याने वाढतेय रुग्णसंख्या
रावेर, मुक्ताईनगर, यावल या तालुक्यात कोविड रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. दवाखान्यांमध्ये रुग्णांना वेळेवरती बेड उपलब्ध नसतात तसेच शासकीय कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता झपाट्याने वाढत असलेली रुग्ण संख्या असल्याने आपण पुर्व तयारी म्हणून रेल्वे मार्फत सुरू असलेली रेल्वे डब्यांचे कोविड सेंटर सावदा रेल्वे स्टेशन येथे सुरु करावे कारण तसे झाल्यास सावदा रेल्वे स्टेशन हे चार तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. स्टेशनवर गर्दी नसल्याने व येथे माल धक्का असल्याने रेल्वे ये-जा करणार्‍या गाड्यांना याचा त्रास होणार नाही. खासदार रक्षा खडसे यांनी या आमच्या मागणीचा व या मध्यवर्ती ठिकाणाचा विचार करुन सावदा रेल्वे स्टेशन येथे रेल्वेचे रेल्वे डब्यांचे कोविड सेंटर तत्काळ सुरू करावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले.

यांची निवेदनावर स्वाक्षरी
निवेदनावर शिवसेना शहरप्रमुख भरत वसंत नेहेते, तालुका उप प्रमुख धनंजय वासुदेव चौधरी, माजी नगरसेवक शाम वसंत पाटील, शिवसेना रावेर क्षेत्र प्रमुख मिलिंद सुरेश पाटील, संघटक शरद गिरधर भारंबे यांच्या सह्या आहेत. हे निवेदन खासदार रक्षा खडसे यांना ऑनलाईन पद्धतीने इमेल व ट्विटरद्वारे पाठवण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,भाजपा महाराष्ट्र कार्यालय यांना पाठवण्यात आल्या आहेत.

Copy